नाशिकमध्ये महिला पत्रकारांचा जागर: १८-१९ एप्रिलला व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य अधिवेशन

नाशिक, १० एप्रिल – *व्हॉईस ऑफ मीडिया* या पत्रकार संघटनेच्या वतीने नाशिक येथे येत्या १८ आणि १९ एप्रिल रोजी दोन दिवसीय महिला पत्रकार राज्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात राज्यभरातील महिला पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, पत्रकारितेतील महिलांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
अधिवेशनासाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत १४ एप्रिल २०२५, सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून, पल्लवी शेटे (९३२२६२८४४८) आणि सुनिता पाटील (९१४६७१७२७७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणी करताना पूर्ण नाव, टीम लीडरचे नाव, टीममधील सदस्यांची माहिती, प्रवासाचे साधन आणि नाशिकमधील आगमनाची वेळ या सारखा तपशील देणे आवश्यक आहे. निवास आणि भोजन व्यवस्थेत गैरसोय टाळण्यासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.
१५० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून येणाऱ्या पत्रकारांनी १७ एप्रिल रोजीच नाशिक मध्ये मुक्काम करावा, अशी सूचना देण्यातआली आहे. तसेच, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील महिला पत्रकारांना सोबत आणण्यासाठी विशेष प्रयत्नकरावेत, असे *व्हॉईस ऑफ मीडिया*च्या प्रदेश अध्यक्ष रश्मी मारवाडी (७३०४७३३४२०) आणि सविता चंद्रे (७२१९१४९०११) यांनी सांगितले.
या अधिवेशनाचे नियोजन तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर समन्वयाने होत असून, पुढील तपशील लवकरच जाहीर केलेजाणार आहेत. पत्रकारितेतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे अधिवेशन मैलाचा दगड ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.