April 25, 2025

आदिवासी भागातील खेळाडूंनी गाठली राष्ट्रीय पातळी: मुनघाटे महाविद्यालयाचा गौरव

कुरखेडा, १० एप्रिल : दंडकारण्य शैक्षणिक सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेद्वारा संचालित श्री गोविंदराव मुनघाटे कला विज्ञान महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. या महाविद्यालयाच्या सात खेळाडूंनी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठाच्या संघात स्थान मिळवले आहे. ही स्पर्धा विक्रम सिंहपुरी विद्यापीठ, नेल्लोर येथे एप्रिलमे २०२५ मध्ये आयोजित होणार असून, या यशा मुळे कुरखेड्या सारख्या ग्रामीण आणि नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.

या स्पर्धेसाठी मुलांच्या संघात महाविद्यालयाचे हरीश नन्नावरे, भूषण डोकरमारे, अस्पाक शेख आणि लोचन झोडे यांची निवड झालीआहे. तर मुलींच्या संघात दर्शना मडावी आणि साक्षी कोडाप यांनी स्थान मिळवले असून, भूमिका वटी ही राखीव खेळाडू म्हणून संघात सामील झाली आहे. या खेळाडूंनी कठोर मेहनत आणि समर्पणाने हे यश संपादन केले असून, त्यांच्या या कामगिरी मुळे महाविद्यालयाचे नाव देशपातळीवर झळकणार आहे.

श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाचा शारीरिक शिक्षण विभाग प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या कुशल मार्गदर्शना खाली सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. आतापर्यंत या महाविद्यालयाच्या १६० हून अधिक विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठाचे विविध क्रीडा संघात प्रतिनिधित्व करतकलर होल्डरहा मानाचा किताब मिळवला आहे. या यशा मुळे अनेक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून, ते आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, २०२४२५ या सत्रात एकूण १३ खेळाडूंची निवडविविध विद्यापीठ संघात झाली आहे, जे या महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचे द्योतक आहे.

या पूर्वीही या महाविद्यालयाच्या खेळाडूंनी देशभरातील नामांकित स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. देवी अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, इंदोर येथील बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी दोन मुली, बंगलोर विद्यापीठ येथील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी तीन मुले, लवली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब येथील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी एक मुलगी आणि बेंगलोर उत्तर विद्यापीठ येथील बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी पाच खेळाडूंची निवड झाली होती. ही यशोगाथा या महाविद्यालयाच्या क्रीडा संस्कृतीचा वारसा अधोरेखित करते.

या नव्या यशाबद्दल दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे म्हणाले, “आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात संधी देणे आणि त्यांचे कौशल्य घडवणे हे आमचे ध्येय आहे. या खेळाडूंनी आमचा विश्वास सार्थ ठरवला आहे.” शारीरिक शिक्षण विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. दशरथ आदे आणि प्रशिक्षक प्रा. हरीश बावनथडे यांनी ही खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक केले. या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ही कामगिरी केवळ महाविद्यालयासाठीच नव्हे, तर संपूर्ण कुरखेडा परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या खेळाडूंनी आपल्या प्रतिभेने सिद्ध केले आहे की, प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत आणि चिकाटीने मोठे यश मिळवता येते. आता सर्वांचे लक्ष या खेळाडूंच्या नेल्लोर येथील कामगिरीकडे लागले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!