April 25, 2025

आमदार वंजारींचा संकल्प: पुस्तकांतून प्रेरणा, संगणकांतून भविष्य

“१७ एप्रिलला गडचिरोलीत ‘कर्तव्यपूर्ती सोहळा’ आमदार अभिजित वंजारी यांच्या निधीतून ग्रंथालयांना पुस्तके आणि शाळांना संगणकांचे होणार वाटप”

नागपूर, १६ एप्रिल २०२५: नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी शैक्षणिक प्रगतीसाठी आमदार निधीचा वापर करून एक अभिनव पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत गुरुवार, १७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय (कॅम्पस) परिसरातील नियोजन भवनातकर्तव्यपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात जिल्ह्यातील ग्रंथालयांना आधुनिक पुस्तके आणि निवडक शाळांना संगणकांचे वाटप केले जाणार आहे.

संगणक आणि मोबाईलच्या युगात ग्रंथालये ओस पडत असताना, आमदार वंजारी यांनी आजच्या काळाची गरज ओळखून जागतिक घडामोडी, तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य आणि करियर संधीं वरील पुस्तकांचा समावेश ग्रंथालयांसाठी केला आहे. या सोबतच, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे तांत्रिक आणि संगणकीय ज्ञान वाढावे यासाठी शाळांना संगणकांचे वाटप केले जाणार आहे.

हा उपक्रम आमदार वंजारी यांनी निवडून आल्यानंतर पहिल्या वर्षा पासून सुरू केला असून, दरवर्षी त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. यंदाच्याकर्तव्यपूर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार अभिजित वंजारी असतील. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विश्वजित कोवासे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहरराव कोरेटी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

शैक्षणिक क्षेत्राशी आणि ग्रंथालयांशी संबंधित सर्वांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा उपक्रम शैक्षणिक विकासाला चालना देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!