April 25, 2025

तलावांना नवजीवन, गावकऱ्यांना समृद्धी: सृष्टी संस्थेच्या पुढाकाराने मासेमारी सोसायट्यांना डोंगे वाटप

“बारमाही मासेमारीसाठी तलावांचे पुनर्जनन! सृष्टी संस्थेच्या पुढाकाराने ग्रामसभांना डोंगे वाटप”

कुरखेडा , १६ एप्रिल : सृष्टी संस्थेच्या पुढाकाराने वडसा आणि कुरखेडा तालुक्यातील मासेमारी सोसायट्या ग्रामसभांनानवसंजीवनी मिळाली आहे. मत्स्यपालनातून अपेक्षित उत्पन्न आणि माशांच्या वाढीच्या समस्यांना तोंड देण्यासाठी संस्थेने तलावपुनर्जनन आणि बारमाही मासेमारीला चालना देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.

संस्था संयोजक केशव गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभांच्या बैठका घेऊन स्थानिक तलावांचे पुनर्जनन आणि मत्स्य खाद्यलागवडीच्या पद्धतींची माहिती देण्यात आली. प्राइस वाटर हाउस कॉपर्सच्या आर्थिक सहयोगाने गोंदिया येथील नवेगावबांध आणिशिवणीबांध मत्स्यपालन केंद्रांना भेटी आयोजित करून सोसायटी पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यात वडसा तालुक्यातीलआमगाव, बोळधा, कोरेगाव, चोप आणि कुरखेडा तालुक्यातील नल्लीकसा, दल्ली, चिपरी, सोनपूर येथील प्रतिनिधी सहभागी झाले.

प्रकल्पाचा मुख्य टप्पा म्हणजे वडसा तालुक्यातील आमगाव, बोळधा, कोरेगाव, चोप आणि कुरखेडा येथील नल्लीकसा येथीलमोठ्या तलावांमध्ये बारमाही मासेमारीसाठी ग्रामसभांना डोंगे आणि जॉकेट वाटप. संस्थेचे कार्यकर्ते कुणाल गुरनुले आणि राकेशखेवले यांच्या प्रयत्नांनी हे वाटप यशस्वी झाले. यामुळे गावकऱ्यांना वर्षभर मासे उपलब्ध होणार असून, मासे विक्रीतून ग्रामसभांचेउत्पन्न वाढण्यास मदत होईल.

हा उपक्रम स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासोबतच मासेमारी सोसायट्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचेपाऊल आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!