राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीसाठी आरमोरीत जोश: डॉ. रामकृष्ण मडावी यांचा सदस्य नोंदणीचा नारा

आरमोरी, २० एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला स्थानिक पातळीवर अधिक सशक्त करण्यासाठी आरमोरी शहरात प्राथमिक सदस्यनोंदणी मोहिमेला वेग देण्याचा संकल्प करण्यात आला. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी कार्यकर्त्यांनाजास्तीत जास्त नागरिकांना पक्षाशी जोडण्याचे आवाहन केले. त्यांच्या निवासस्थानी आयोजित पक्षाच्या आढावा बैठकीतकार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हा संदेश दिला.
डॉ. मडावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तालुका अध्यक्ष अमीन लालानी, शहर अध्यक्ष प्रदीप हजारे, तालुकाकार्याध्यक्ष सुनील नंदनवार, जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या कल्पना तिजारे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाकार्याध्यक्षा रुषाली भोयर, तालुका महिला अध्यक्षा संगीता मेश्राम, शहर महिला अध्यक्षा जयश्री भोयर, युवा नेते आकाश मडावी, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळाजी बोरकर, हरिराम मातेरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत प्राथमिक सदस्य नोंदणीच्याप्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि कार्यकर्त्यांना नोंदणी पुस्तिका वितरित करण्यात आल्या.
“पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवून अधिकाधिक लोकांना जोडा. यातूनच आपली ताकद वाढेल,” असे डॉ. मडावी यांनी सांगितले. बैठकीला शहर सरचिटणीस राकेश बेहरे, उपाध्यक्ष प्रफुल राचमलवार, रामदास दहिकर, सुनील बांगरे, प्रशांत मोगरे, नरेंद्र निंबेकर, अक्षय बोरकर, शाम सपाटे, श्रीधर पोटेकर, मनोज दुमाने, ललिता भोयर, भूमिका बागडे, चित्रा मेश्राम, संगीता घाटूरकर, गीता सपाटे, राजू किरमे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
या बैठकीने आरमोरीत पक्षाच्या कार्याला नवी चालना मिळाली आहे. सदस्य नोंदणी मोहिमेला येत्या काळात आणखी गतीमिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे पक्षाची स्थानिक पकड अधिक मजबूत होईल.