April 25, 2025

आप’ली सुराज्य मोहीम’ : शेतकऱ्यांचा आवाज घेऊन AAP ची महाराष्ट्रात जनजागृती

“१ मे ते १५ मे २०२५ या कालावधीत चंद्रपूर ते सिंधुदुर्ग अशा ३६ जिल्ह्यांमधून ,४०० किलोमीटरचा प्रवास करत ही मोहीम शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करेल.”

मुंबई, २१ एप्रिल :आम आदमी पार्टी (AAP) महाराष्ट्राने शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि भ्रष्ट व्यवस्थेला आव्हान देण्यासाठीआपली सुराज्य मोहीम’” या राज्यव्यापी अभियानाची घोषणा केली आहे. मे ते १५ मे २०२५ या कालावधीत चंद्रपूर ते सिंधुदुर्ग अशा ३६ जिल्ह्यांमधून ,४०० किलोमीटरचा प्रवास करत ही मोहीम शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करेल. “शेतकऱ्यांशी दगाकरणाऱ्यांनो, खुर्ची खाली कराजनता येतेय!” असा इशारा देत AAP ने पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि खऱ्या विकासाची मागणी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, फुलेशाहूआंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांच्या पुरोगामी विचारांनी प्रेरित ही मोहीम शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जबाजारीपणा, पिकांना योग्य भाव मिळणे आणि सरकारी योजनांमधील भ्रष्टाचारयांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर जनजागृती करेल. “हा आवाज आहे शेतकऱ्यांचाजो विचारतेय: आमचं काय?” असा सवाल उपस्थितकरत AAP ने शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. मोहिमेचा उद्देश शेतकऱ्यांच्या समस्या केंद्रस्थानी आणणे, भ्रष्ट व्यवस्थेला आव्हान देणे आणि AAP ची लोककल्याणकारी विचारसरणी जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे.

१५ दिवसांच्या या मोहिमेत AAP कार्यकर्ते गावागावांत पोहोचून शेतकऱ्यांशी संवाद साधतील, त्यांच्या समस्या जाणून घेतील आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देतील. जनजागृती सभा, रॅली आणि सोशल मीडियाद्वारे #आपली_सुराज्य_मोहीम, #AAPli_Surajya_Mohim, #AAPMaharashtra, #चलासत्यबोलूया या हॅशटॅग्सखाली संदेश प्रसारित केला जाईल. मोहिमेत सहभागी होण्यासाठी https://surveyheart.com/form/67f4b8d2dbfcb720f671d80f या लिंकवरील फॉर्म भरण्याचे आवाहन सर्व कार्यकर्ते आणि समर्थकांना करण्यात आले आहे.

मोहिमेचे नेतृत्व AAP महाराष्ट्राचे राज्य संघटन सचिव ऍड. मनीष दामोदरराव मोडक (9822611100) आणि मीडिया प्रमुख नामदेव भागीले पाटील (9764012206) करत आहेत. “ही मोहीम केवळ राजकीय नाही, तर सामाजिक न्यायाची आणि महाराष्ट्राच्या आत्म्याला साद घालणारी आहे,” असे पाटील यांनी सांगितले. सर्व पक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांना सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. “चला सत्य बोलूयाआपल्या महाराष्ट्रासाठी!” असा संदेशदेत AAP ने जनतेला परिवर्तनाच्या लढ्यात सामील होण्याचे आवाहन केले.

आपली सुराज्य मोहीमशेतकरीकेंद्रित असून, राज्यातील प्रत्येक गाव आणि शहराला जोडेल. ही मोहीम महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासाला पुढे नेत आहे. “महाराष्ट्र बदलायचा असेल, तर आता एकत्र येण्याची वेळ आहे,” असे मोडक म्हणाले. नागरिकांनी फॉर्मभरून आणि सोशल मीडियावर सहभाग दर्शवून या मोहिमेला बळ द्यावे, अशी विनंती AAP ने केली आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!