सिरोंचात कृषी क्रांती! मिरची आणि कलेक्टर आंब्याला जागतिक ओळख देण्यासाठी प्रीती हिरळकर यांचा मास्टरप्लॅन

गडचिरोली, 21 एप्रिल : सिरोंचा तालुका कृषी क्षेत्रात इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे! जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि आत्मा (सोनापूर–गडचिरोली) प्रमुख प्रीती हिरळकर यांनी अंकिसा येथील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना आणि प्रगतशील शेतकरी विश्वेश्वरय्या कोंड्रा यांच्या कलेक्टर आंबा फळबागेस भेट देऊन सिरोंचाच्या शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत नेण्याचा संकल्प जाहीर केला. मिरची उत्पादनाला चालना आणि कलेक्टर आंब्याला भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळवण्याच्या या धडाकेबाज प्रयत्नांनी शेतकरी उत्साहाने भारले आहेत.
मिरची शेतकऱ्यांना ‘मसाला’ यशाचा!
हिरळकर यांनी अंकिसा येथील मिरची शेतांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येला हात घातला. हवामान बदलाचे आव्हान असोवा काढणीतील अडचणी, त्यांनी प्रत्येकाला मार्ग दाखवला. “मिरची प्रक्रिया उद्योग आणि कोल्ड स्टोरेजमुळे तुमचे उत्पन्न दुप्पटहोईल!” असा दमदार सल्ला देत त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या सुविधांचा पुरेपूर वापर करण्याचा मंत्र दिला. शेतकऱ्यांचे डोळे चमकले, कारण आता त्यांच्या मिरचीला देशभरात मागणी वाढणार आहे!
कलेक्टर आंबा: सिरोंचाचा ‘हिरा’ जागतिक पटलावर
कोंड्रा यांच्या कलेक्टर आंबा फळबागेची पाहणी करताना हिरळकर यांनी या दुर्मिळ वाणाला GI Tag मिळवण्याचा विडा उचलला. स्वातंत्र्यपूर्व काळात जिल्हाधिकारी जॉर्ज यांनी विदेशातून आणलेला हा आंबा 2-2.5 किलो वजन, सलादीसाठी ग्राहकांची पसंतीआणि स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेने ओळखला जातो. फक्त पाच ते दहा शेतकऱ्यांकडे असलेला हा ‘हिरा’ आता जागतिक बाजारपेठेत चमकणार! हिरळकर यांनी GI Tag प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
शेतकऱ्यांचा उत्साह शिगेला
या भेटीवेळी तालुका कृषी अधिकारी चेतन पानबुडे, कृषी पर्यवेक्षक एस. एस. शिंगणे आणि शेतकरी उपस्थित होते. “हिरळकर मॅडमच्या पाठबळाने आमची मिरची आणि आंबा जगभर पोहोचेल!” असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला. सिरोंचा आता कृषी क्रांतीच्या नव्या युगात प्रवेश करत आहे, आणि हिरळकर यांचा हा मास्टरप्लॅन शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल करणार आहे!