पहलगाम दहशतवादी हल्ला: गडचिरोलीतील अडकलेल्या पर्यटकांसाठी तातडीची हेल्पलाइन

गडचिरोली, २३ एप्रिल : कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यामुळे अनेक पर्यटक अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संकटात गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक अडकले असल्यास त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विशेष हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
श्रीनगर हेल्पलाइन क्रमांक:
– फोन: 0194-2463651 / 2457543 / 2483651
– व्हॉट्सअॅप: 7780805144 / 7780938397 / 7006058623
गडचिरोली नियंत्रण कक्ष:
– फोन: 07132-222031
– मोबाइल: 9423911077
– श्री. निलेश तेलतुंबडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी: 8668383300
– श्री. स्वप्निल माटे, सहायक महसूल अधिकारी: 9421857746
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे अडकलेल्या कोणत्याही व्यक्तीची माहिती त्वरित वरील क्रमांकांवर कळवावी. तसेच, यासंदर्भातील माहिती सर्वत्र प्रसारित करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाला सूचना देण्यात आल्या आहेत.
“या संकटकाळात प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. कृपया सतर्क राहा आणि आवश्यक माहिती तातडीने कळवा.”