May 21, 2025

गोठणगांव व पलसगड येथील शासकीय धान खरेदी केंद्रांचे आमदार मसराम यांच्या हस्ते उद्घाटन

कूरखेडा, २१ मे : तालुक्यातील बहुप्रतीक्षित गोठणगांव आणि पलसगड येथील शासकीय आधारभूत रब्बी धान खरेदी केंद्रांचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या केंद्रांच्या उशिरा सुरुवातीमुळे शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना ४०० ते ५०० रुपये कमी दराने धान विकावे लागत होते, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता.

काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले होते. अखेर आदिवासी विकास महामंडळाने तातडीने केंद्रे सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, आज गोठणगांव आणि पलसगड येथील केंद्रांचा शुभारंभ झाला. याप्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष जीवन पाटील नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक एस. एस. सांबरे, उपप्रादेशिक व्यवस्थापक जी. एम. सावळे, माजी जि.प. सदस्य प्रभाकर तूलावी, माजी सभापती गिरीधर तितराम, जावेद शेख, गोठणगांव आविका सभापती यशवंत पाटील चौरीकर, संचालक हिराजी माकडे, जीवन मेश्राम, मोहन कुथे, श्रीराम नैताम, प्रल्हाद ठाकरे, व्यवस्थापक धनुष मंगर, महेश खोबरे, पलसगड संस्थेचे सुभाष बन्सोड, दुर्गोधन पूराम, सुरेश दर्रो, सुमीत कोसरे, अविनाश वलका यांच्यासह स्थानिक शेतकरी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही केंद्रे सुरू झाल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे आर्थिक नुकसान टळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.”

About The Author

You may have missed

error: Content is protected !!