September 9, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

गडचिरोलीत आदिवासी युवक-युवतींसाठी स्वप्नपूर्तीच्या योजना: १००% अनुदान!

गडचिरोलीत आदिवासींसाठी २०२५-२६ साठी उत्पन्नवाढीच्या योजनांना मोठा निधी: १००% पर्यंत अनुदान!

गडचिरोली, २ जून : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात विविध उत्पन्नवाढीच्या योजनांसाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्पातून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. यामध्ये बेरोजगार आदिवासी युवक-युवतींसाठी व्यवसायांसाठी आर्थिक मदत, शेतकऱ्यांसाठी ताडपत्री, स्प्रे पंप, काटेरी तार, मोहफुल-निंबोळी संकलनासाठी जाळी, थ्रेशर मशीन, फळबाग लागवडीसाठी साहित्य, मत्स्यसंवर्धन साहित्य खरेदीसाठी ८५% ते १००% अनुदान देण्यात येणार आहे.

याशिवाय, सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आणि वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी शेत सपाटीकरणासारख्या योजनांचा समावेश आहे. महिला बचत गटांसाठी विशेष प्रोत्साहनही दिले जाणार आहे. अर्जदारांनी अनुसूचित जमातीचा दाखला (उपविभागीय अधिकारी स्वाक्षरीसह), रहिवासी दाखला, चालू वर्षातील उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार स्वाक्षरीसह), ग्रामसभा ठराव, आधार कार्ड, आधार लिंक बँक खात्याची छायांकित प्रत आणि विधवा, परित्यक्त्या, अपंग, वनहक्क पट्टाधारकांसाठी स्वतंत्र प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

पात्र लाभार्थ्यांनी www.nbtribal.in या अधिकृत पोर्टलवर १५ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. या योजनांमुळे आदिवासी समुदायाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

About The Author

error: Content is protected !!