October 22, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट: इतिहास आणि श्रद्धेचा संगम घडवणारी रेल्वे यात्रा

“छत्रपती शिवाजी महाराज सर्किट: भारत गौरव यात्रा ट्रेनने शिवछत्रपतींच्या वारशाचा अविस्मरणीय प्रवास”

गडचिरोली, 02 जून : रेल्वे मंत्रालयाच्या IRCTC आणि महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने ‘भारत गौरव यात्रा टुरिस्ट ट्रेन’ अंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ हा अनोखा उपक्रम सुरू होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाला मानवंदना देणारा हा उपक्रम नागरिकांना त्यांच्या जीवनाशी निगडित ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा अविस्मरणीय प्रवास घडवणार आहे.

या सर्किटमध्ये रायगड किल्ला, पुणे (लाल महाल, कसबा गणपती, शिवसृष्टी), शिवनेरी किल्ला, भिमाशंकर ज्योतिर्लिंग, प्रतापगड किल्ला आणि कोल्हापूर (महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा किल्ला) यांसारख्या प्रमुख स्थळांचा समावेश आहे. पहिली ट्रेन 9 जून 2025 रोजी (शिवराज्याभिषेक दिनी) मुंबई सीएसएमटी स्थानकावरून सुटणार आहे.

विशेषत: युवक, विद्यार्थी, शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमी यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. संपूर्ण माहिती gadchiroli.nic.in या वेबसाइटवर ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या नावाने उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी किंवा मदतीसाठी IRCTC चे जीजीएम गौरव झा यांच्याशी 8287931600 या क्रमांकावर संपर्क साधावा.

या उपक्रमातून शिवछत्रपतींच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देत, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!