September 8, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

१० ते २४ जुलै: गडचिरोलीत माओवादी स्मारक सभेमुळे जमावबंदी लागू

“माओवादी स्मारक सभेच्या धोक्याने गडचिरोलीत १५ दिवसांची कठोर जमावबंदी”

गडचिरोली, ९ जुलै : छत्तीसगडच्या अबुझमाड परिसरात नुकत्याच झालेल्या चकमकीत २७ माओवाद्यांच्या मृत्यूनंतर माओवादी संघटनांनी ११ जुलै ते ३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत स्मारक सभा आणि आंदोलनांचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी १० जुलैच्या मध्यरात्रीपासून २४ जुलै २०२५ च्या मध्यरात्रीपर्यंत १५ दिवसांची जमावबंदी लागू केली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) आणि (३) अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. या कालावधीत शस्त्रे, दगड, स्फोटके, भडकाऊ साहित्य बाळगणे, घोषणा देणे, सभा घेणे, पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव करणे आणि मिरवणुका काढणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणतीही आंदोलनात्मक कृती करण्यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. हा आदेश संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात लागू राहील.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

About The Author

error: Content is protected !!