September 12, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

गडचिरोलीत सरपंच आरक्षण सोडत सभेची तारीख बदलली, १४ जुलैला होणार आयोजन

गडचिरोली, ८ जुलै: गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी नियोजित सोडत सभेची तारीख बदलण्यात आली आहे. यापूर्वी ९ जुलै २०२५ रोजी होणारी ही सभा आता शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार १४ जुलै २०२५ (सोमवार) रोजी सकाळी ११:३० वाजता गोंडवाना कला दालन, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अवर सचिवांनी दिलेल्या पत्रानुसार, सरपंच आरक्षणाची प्रक्रिया नव्याने सुनिश्चित करण्याच्या सूचनेमुळे ५ मार्च २०२५ च्या अधिसूचनेऐवजी १३ जून २०२५ च्या अधिसूचनेनुसार ही सोडत सभा घेण्यात येत आहे.

तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार, गडचिरोली यांनी सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांना या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ही सभा ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून, आरक्षण प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

About The Author

error: Content is protected !!