September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

गडचिरोलीत पूरामुळे सात प्रमुख मार्ग बंद; गोसीखुर्द धरणातून 5,587 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग

गडचिरोली, 27 जुलै : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि गोसीखुर्द धरणातून 5,587 क्युमेक्स (1,97,288 क्यूसेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सात प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत किंवा त्यावर निर्बंध लागू आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आज सकाळी 9:00 वाजता दिली.

बंद मार्ग आणि निर्बंध:
1. हेमलकसा-भामरागड राष्ट्रीय महामार्ग-130 डी : पर्लकोटा नदीमुळे पूर्णपणे बंद. (तालुका: भामरागड)
2. सिरोंचा-असरअली-जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग-63 : वडधम गावादरम्यान हलक्या वाहनांसाठी खुला, जड वाहतूक बंद. (तालुका: सिरोंचा)
3. अहेरी-वटरा रस्ता (राज्यमार्ग-370) : वटरा नाल्यामुळे बंद. (तालुका: अहेरी)
4. कुरखेडा-वैरागड रस्ता (राज्यमार्ग-377) : सती नदीमुळे बंद. (तालुका: कुरखेडा)
5. कढोली-उराडी रस्ता (प्रजिमा-7) : पूरामुळे बंद. (तालुका: कुरखेडा)
6. हलवेर-कोठी रस्ता (इजिमा-24) : पूरामुळे बंद. (तालुका: भामरागड)
7. भेंडाळा-बोरी-गणपूर रस्ता (प्रजिमा-17) : पूरामुळे बंद. (तालुका: चामोर्शी)

प्रशासनाचे आवाहन : नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात प्रवेश करू नये. वाहतूक सुरू होण्याबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी माहिती दिली जाईल. सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!