श्रीराम विद्यालय, कुरखेडा येथे पालक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद; शिक्षक-पालक संघाची स्थापना

“श्रीराम विद्यालय, कुरखेडा येथे पालक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद; शिक्षक-पालक संघाची स्थापना”

कुरखेडा, २९ जुलै : आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेद्वारे संचालित श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, कुरखेडा येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आयोजित पालक सभेला पालकांचा उत्साहपूर्ण सहभाग लाभला. या सभेत शिक्षक-पालक व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली तसेच शालेय स्तरावरील विविध समित्यांचे गठन करण्यात आले.

सभेत पालकांना प्रथम घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा, विद्यार्थी उपस्थिती, शालेय पोषण आहार, सती नदीच्या पुलाची समस्या, अभ्यासक्रम, शासकीय उपक्रम आणि विद्यालयाच्या उपक्रमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. पालकांनी उपस्थित केलेल्या मागण्या आणि सूचनांवर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या. विशेषत: पालक-शिक्षक संघाच्या स्थापनेमुळे शाळा आणि पालकांमधील सहकार्य अधिक दृढ होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सहसचिव व प्राचार्य नागेश्वर फाये यांनी भूषवले. यावेळी शिक्षक एस. आर. कोडापे, एस. बी. शिरपूरवार, डी. एम. नाकतोडे, व्ही. व्ही. फाये, विलास मेश्राम, वासुदेव मस्के, आर. एम. पंधरे, प्रा. प्रदीप पाटणकर, प्रा. अश्विनी एच. फाये, प्रा. विनोद नागपूरकर, प्रा. सत्यम फटिंग, विशाखा खुणे, प्रियंका उईके, स्नेहा दहीकर, आरती कवाडकर तसेच वरिष्ठ लिपिक एच. व्ही. भरणे, भास्कर बारसागडे, ए. एस. परशुरामकर, के. एम. बनसोड, हरीश टेलका, स्वप्नील खोब्रागडे आणि श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रा. प्रदीप पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले, तर एस. बी. शिरपूरवार यांनी आभार प्रदर्शन केले. मोठ्या संख्येने उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रश्न मांडले, ज्यामुळे ही सभा अत्यंत परिणामकारक ठरली. पालक आणि शाळा यांच्यातील या संवादामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!