September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

खत विक्रेत्यांनो सावधान! ई-पॉस अपडेट करा, अन्यथा परवाना रद्द

गडचिरोली, ३० जुलै : जिल्ह्यातील सर्व रासायनिक खत विक्रेत्यांना अनुदानित खत विक्रीसाठी ई-पॉस (e-PoS) प्रणालीचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. कृषी विभागाने याबाबत कठोर सूचना जारी केल्या असून, ई-पॉस प्रणालीतील नोंदी आणि प्रत्यक्ष गोडावूनातील साठ्यात तफावत आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे. यामध्ये कारणे दाखवा नोटीस आणि परवाना नूतनीकरणावर बंदी यांचा समावेश आहे.

अनुदानित खत विक्री केवळ ई-पॉस प्रणालीद्वारेच करण्याचे निर्देश असून, विक्रीची नोंद iFMS प्रणालीत त्वरित आणि अचूक नोंदवणे बंधनकारक आहे. याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी क्षेत्रीय खत निरीक्षकांना नियमित तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. साठ्यातील त्रुटी आढळल्यास कडक कारवाई होईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

L1 सुरक्षा मशीनसाठी १० ऑगस्टची अंतिम मुदत
ज्या विक्रेत्यांनी अद्याप L1 सुरक्षा मानक असलेली ई-पॉस मशीन वापर सुरू केलेली नाही, त्यांनी १० ऑगस्ट २०२५ पर्यंत मशीन अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी केले आहे. यासाठी विक्रेत्यांनी जिल्हा कृषी विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!