April 23, 2026

आरमोरीत जुन्या इमारतीचा भाग कोसळला: तिघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

आरमोरी, ८ ऑगष्ट : आज दुपारी २ वाजेच्या सुमारास आरमोरी येथील पंचायत समितीसमोरील अमित लालानी यांच्या मालकीच्या ३० ते ३५ वर्षे जुन्या इमारतीचा समोरील भाग कोसळल्याने दुर्दैवी घटना घडली. यात तहसिन शेख (वय ३०, रा. वडसा), अफसान शेख (वय ३२, रा. वडसा) आणि आकाश बुरांडे (रा. निलज) यांचा मृत्यू झाला, तर सौरभ चौधरी (रा. मेंडकी, ता. ब्रम्हपुरी), विलास मने (वय ५०, रा. आरमोरी) आणि दीपक मेश्राम (वय २३, रा. आरमोरी) हे तिघे गंभीर जखमी झाले.

सदर इमारतीत हिरो होंडा टू-व्हीलर शोरूम आणि वरच्या मजल्यावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय आहे. शुक्रवार बाजाराचा दिवस असल्याने शोरूममध्ये ग्राहक आणि कामगार उपस्थित होते. इमारत कोसळल्यानंतर मोठी गर्दी जमली. प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरू केले. आरमोरी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पावसामुळे जुन्या इमारतींना धोका निर्माण झाल्याने नगर प्रशासनाकडून घरमालकांना नोटिसा दिल्या जातात. मात्र, आरमोरी नगर परिषदेने अशी नोटीस दिली होती की नाही, याबाबत अधिकृत माहिती नाही. वेळीच दक्षता घेतली असती, तर ही जीवितहानी टाळता आली असती, अशी स्थानिकांची भावना आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!