October 22, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

दुर्गम गावाला आरोग्याचा आधार: तुमनूर उपकेंद्राचे शानदार भूमिपूजन

“आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भव्य भूमिपूजन”

आनंद दहागावकर, सिरोंचा, १२ ऑगस्ट :  तालुक्यातील तुमनूर येथे ग्रामीण आरोग्य सेवांना बळकटी देण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले गेले. आज सकाळी ९ वाजता आमदार व माजी केबिनेट मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाचे भव्य भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील नागरिकांना लांबचा प्रवास टाळून स्थानिक पातळीवर त्वरित आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

सिरोंचा तालुका मुख्यालयापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या तुमनूर गावात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गावकऱ्यांचा मोठा जमाव या कार्यक्रमाला उपस्थित होता. नवीन आरोग्य उपकेंद्रामुळे प्राथमिक उपचार, लसीकरण, गर्भवती माता आणि बालकांची आरोग्य तपासणी यांसारख्या सेवा गावातच मिळतील, याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

या सोहळ्याला तुमनूर ग्रामपंचायत सरपंच श्रीमती पदमा राजन्ना सिडाम, उपसरपंच श्रीमती बबीता किरण वेमुला, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगरसेवक सतिश राचर्लावार, जगदीश रालबंडीवार, कार्यकारी अध्यक्ष मदनया मादेशी, शहर अध्यक्ष रवि सुलतान, पत्रकार व सोशल मीडिया प्रमुख नागभूषणम चकिनारपुवार, सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश ताटीकोंडावार, रामकिष्ट रामया निलम (जिल्हा उपाध्यक्ष), वेंकटेश दुर्गम, रमेश पोटयाला, माजी उपसरपंच किरण वेमुला, सामाजिक कार्यकर्ते राजू ताटी, नागेश गुरूसिंगला, अभियंता वाय. आर. मसे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या मनोगतात आमदार डॉ. आत्राम म्हणाले, “सिरोंचा तालुक्यातील दुर्गम गावांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे हे माझे प्राधान्य आहे. या उपकेंद्राच्या भूमिपूजनाने तुमनूरला आरोग्याचा नवा श्वास मिळाला आहे. लवकरच हे केंद्र पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत रुजू होईल.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते नागभूषणम चकिनारपुवार यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी गावाच्या आरोग्य उन्नतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. भूमिपूजनानंतर गावात आनंदोत्सवाचे वातावरण पसरले, आणि तुमनूरच्या नागरिकांनी या विकासात्मक पावलाचे स्वागत केले.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!