कुरखेडा येथील संस्कार पब्लिक स्कूलमध्ये भारताच्या नकाशातून राष्ट्रीय एकतेचा संदेश

कुरखेडा, १३ ऑगस्ट : संस्कार पब्लिक स्कूल, कुरखेडा येथे एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. प्राध्यापिका नेहा फाये यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भारताच्या नकाशाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रगीताचे महत्त्व आणि भारताच्या सांस्कृतिक वैविध्याची ओळख करून देण्यात आली. या नकाशामध्ये राष्ट्रगीतातील पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग, विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा आणि उच्छल जलधी तरंग यांचे कलात्मक चित्रण करण्यात आले.

या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी भारताच्या नकाशाला मानवंदना देत राष्ट्रगीताप्रती आदर व्यक्त केला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होण्यास मदत झाली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने हा कार्यक्रम यशस्वी ठरला. प्राध्यापिका नेहा फाये यांच्या या संकल्पनेचे शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्वांनी कौतुक केले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांना भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देण्यासाठी एक मैलाचा दगड ठरला आहे. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीमध्ये देशप्रेम आणि एकतेची भावना बळकट होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!