September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

कुरखेडा तालुक्यात शिवसेनेची नवी उभारी: शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षात समावेश

गडचिरोली, १३ ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात बुधवारी दुपारी ४ वाजता शिवसेना पक्षात शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, ‘लखपती दीदी’, ‘मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ’ यासारख्या जनकल्याणकारी योजनांमुळे प्रभावित होऊन, तसेच शिवसेना विदर्भ नेते किरणजी पांडव यांच्यावरील विश्वासाने हे पक्षप्रवेश झाले.

शिवसेना गडचिरोली महिला जिल्हा संपर्क प्रमुख वर्षाताई मोरे यांच्या शुभहस्ते महिलांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी वरिष्ठ नेते सुरेंद्रभाऊ चंदेल, युवासेना जिल्हा अध्यक्ष दिपकभाऊ भारसागडे, आरमोरी विधानसभा प्रमुख नारायणजी धकाते, समन्वयक राकेश भाऊ बैस, गड महिला जिल्हा प्रमुख श्रीदेवी वर्गंटीवार, उमा ताई चंदेल, कुरखेडा तालुका अध्यक्ष अनिकेतभाऊ आकरे, नगराध्यक्ष अनिताताई बोरकर, तालुका संघटक ईश्वर ठाकरे, वैद्यकीय प्रमुख शहेजादभाई हाश्मी, युवासेना तालुका प्रमुख दिपक धारगाये, नगरसेवक जयेंद्रभाऊ चंदेल, माजी सभापती पुंडलिकभाऊ देशमुख, तालुका उपाध्यक्ष चंदूजी मेहेर, जयश्रीताई रासेकर, दामुभाऊ उईके, राकेशभाऊ सहारे, रूपेश चांदेवार, द्वारकाजी सहारे, रवी पाटील सोनकुसरे, अश्विनी ताई पिंपडकर, सोनी ताई चौधरी यांची उपस्थिती होती.

या प्रवेशामुळे कुरखेडा तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली असून, पक्षाच्या जनकल्याणकारी धोरणांना व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!