September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

अहेरीत दारूबंदी कायद्याचा भंग; आरोपीस तीन महिने कारावास व १०,००० दंड

अहेरी, २० ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल अपराध क्रमांक ०११९/२०१९ मधील एका गुन्ह्यात आरोपी शंकर गंगा येललवार (वय २८ वर्ष, व्यवसाय-शेती, रा. बोरी, ता. अहेरी, जि. गडचिरोली) यास महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (फ) अंतर्गत दोषी ठरविण्यात आले. मा. श्री. शाहिद साजीदुज्जामॉ, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, अहेरी यांनी आरोपीस तीन महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा आणि १०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय न्यायालयीन फौजदारी मामला क्रमांक २२८/२०२५ अंतर्गत दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी देण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार मारोती दामोधर मोहदेकर यांनी केला. तपासादरम्यान त्यांनी आवश्यक पुरावे गोळा करून गुन्हा सिद्ध केला. कोर्टातील कामकाजात सहाय्यक सरकारी अभियोक्ता राजकुमार उंदीरवाडे आणि कोर्ट मोहरर पोहवा/६७७ महेश सलामे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईमुळे दारूबंदी कायद्याच्या अंमलबजावणीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

पोलीस निरीक्षक हर्षल ओकरे यांनी सांगितले की, अहेरी पोलीस स्टेशन अवैध दारूविरोधी कारवाया कठोरपणे करत आहे आणि समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा कारवाया सुरू राहतील. या निकालामुळे गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूच्या व्यापाराला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!