आम आदमी पार्टी गडचिरोलीच्या नवीन कार्यकारिणीची राज्य स्तरावरून घोषणा
गडचिरोली, 04 सप्टेंबर : आम आदमी पार्टी (आप) गडचिरोली जिल्ह्याने आपली संघटनात्मक रचना अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आज राज्य स्तरावरून पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, जिल्हा अध्यक्ष नसिर हाशमी यांच्या शिफारशीवरून 35 नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या नियुक्त्यांद्वारे पक्षाने सर्व सामाजिक स्तरांचा समावेश करत गडचिरोलीत आपली पकड अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे.
नवीन कार्यकारिणीमध्ये विविध आघाड्यांचे नेतृत्व करणारे जबाबदार पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये राजू मडावी आणि नागेश तोरेम यांची उपाध्यक्षपदी, ताहीर शेख यांची संघटन मंत्री म्हणून, तर चेतन गहाणे आणि शत्रुघ्न नन्नावरे यांची सहसंघटन मंत्री म्हणून निवड झाली आहे. अमृत मेहेर यांना सचिव, राहील खतीब यांना मीडिया प्रमुख आणि फैयाज शेख यांना मीडिया उपप्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. इरफान पठाण कोषाध्यक्ष, साहिल बोदेले युवा अध्यक्ष, राहुल मेश्राम युवा उपाध्यक्ष, तर एड. आयेशा शेखानी यांना लीगल सेलच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.
याशिवाय, अतुल सिंदराम यांच्याकडे सोशल मीडिया प्रमुखाची जबाबदारी, सत्यवान रामटेके यांच्याकडे अनुसूचित जाती आघाडी, तबरेज खान यांच्याकडे अल्पसंख्यांक आघाडी, विनायक अनोले यांच्याकडे ओ.बी.सी. आघाडी आणि प्रेम बहेटवार यांच्याकडे लघु व्यवसाय आघाडीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. सौ. उर्मिला दिलीप कतलाम महिला आघाडी, जमीर खतीब ज्येष्ठ नागरिक आघाडी, आसिफ कादर शेख परिवहन आघाडी, साईनाथ कोंडावार कामगार आघाडी, रियाझूल शब्बीर शेख सांस्कृतिक आघाडी, जयदेव रामचंद्र कोडाप शेतकरी आघाडी आणि हिरामण भैसारे सेवा निवृत्त शिक्षक आघाडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. प्रकाश जिवाणी यांना प्रमुख मार्गदर्शक, तर संतोष कोडापे यांना सहसचिवपदी नियुक्ती मिळाली आहे. याशिवाय, महादेव कोपुलवार, हिरा चौधरी, किशोर दखणे, अंकुश मडावी, दुधराम बासोना, डॉ. देवेंद्र मुनघाटे, विनोद मेश्राम, मनीष सहारे आणि रेहान पठाण यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे.
या नियुक्त्यांद्वारे पक्षाने गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विविधतेचा समावेश करत सर्वसमावेशक नेतृत्व निर्माण केले आहे. पक्षाच्या जिल्हा आणि राज्य स्तरावरील सोशल मीडिया हँडल्सवर या घोषणेला व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नसिर हाशमी, जिल्हा अध्यक्ष, आप गडचिरोली यांनी नवीन कार्यकारिणीचे स्वागत करताना सांगितले, “ही नवीन कार्यकारिणी आम आदमी पार्टीच्या पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढण्याच्या विचारधारेला गडचिरोलीत अधिक प्रभावीपणे पुढे नेईल. प्रत्येक आघाडी गडचिरोलीच्या विकासासाठी आणि सामाजिक न्यायासाठी कार्य करेल.”
या घोषणेमुळे गडचिरोली जिल्ह्यात पक्षाच्या कार्याला नवीन गती मिळण्याची अपेक्षा आहे. पक्ष आता स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करून सामान्य नागरिकांच्या हितासाठी कार्य करण्यास सज्ज आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रकाशजी जरवाल प्रभारी , महाराष्ट्र राज्य , अजित फाटके पाटील , प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, डॉ. अभिजीत मोरे, प्रदेश सचिव, भूषण ढाकुलकर, प्रदेश संघटन मंत्री, नसिर हाशमी, जिल्हा अध्यक्ष, गडचिरोली यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
