March 7, 2026

जीवघेण्या प्रवासाला कंटाळलेल्या नागरिकांचा उद्रेक; आम आदमी पार्टीचा थेट इशारा – १५ डिसेंबरला PWD कार्यालयासमोर रस्तारोको-ठिय्या आंदोलन

कुरखेडा (गडचिरोली), १२ डिसेंबर २०२५:गेल्या एका वर्षापासून तळेगावकुरखेडा हा १५ हून अधिक गावांना कुरखेडादेसाईगंज मुख्य मार्गाशी जोडणारा जीवनवाहिनी समानग्रामीण रस्ता खड्ड्यांनी पार पोखरला गेला आहे. दुरुस्तीऐवजी रस्त्यावर मोठाले बोल्डर टाकून तो पूर्णपणे बंदिस्त करण्यात आल्यानेशेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका खासगी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. रोज शेकडो नागरिक यामार्गावरून येजा करतात, पण सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) मात्रनिधी नाही, मुदतवाढ मिळालीअसे सांगून हात वरकरून बसले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सदर रस्त्याचे कंत्राटदाराने काम अर्धवट सोडले असून शासनाने निधीअभावी दोन वर्षांची मुदतवाढ दिल्याचेकारण पुढे करून कंत्राटदार कानावर हात ठेवून बसला आहे. यामुळे रस्ता रखडला आणि नागरिकांचे मात्र हाल सुरू आहेत. रुग्णवाहिकांना खड्ड्यांमुळे अडथळा, शेतमालाची वाहतूक ठप्प, विद्यार्थ्यांना शाळाकॉलेज गाठणे मुश्किलअशी भयावहपरिस्थिती निर्माण झाली आहे.

या दुर्दशासनाला कंटाळून आम आदमी पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नसिर हाशमी यांनी थेट इशारादिला आहे की,

येत्या दिवसांत (१४ डिसेंबर २०२५ पर्यंत) रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही, तर १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक११.०० वाजता PWD च्या कुरखेडा येथील कार्यालयासमोर हजारो नागरिकांसमवेत रस्तारोको ठिय्या आंदोलन छेडले जाईल. गरज पडली तर रस्ता पूर्णपणे जाम करू!” असा इशारा वजा विनंती पत्र आम आदमी पार्टी गडचिरोली जिल्हा सहसंघटक चेतन गव्हाणे, कैलाश उईके यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथे सादर केले आहे. 

नसिर हाशमी यांनी सर्व प्रभावित गावकऱ्यांना आवाहन केले आहे की, आपल्या हक्कासाठी, जीवघेण्या रस्त्याविरुद्ध मोठ्या संख्येने१५ डिसेंबरला PWD कार्यालयासमोर हजर राहावे. प्रशासन खडबडून जागे होणार की पुन्हा एकदा नागरिकांचा संयम संपवणार? हे१५ डिसेंबरलाच ठरेल!

About The Author

You may have missed

error: Content is protected !!