December 23, 2024

जय सेवा क्रीडा मंडळ कोत्तागुडम (वट्रा) च्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबाल सामन्याचे आयोजन

1 min read

*माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न..!!*

 

अहेरी: आनंद दहेगावकर, प्रतिनिधी.

यावेळी खेळाडूना मार्गदर्शन करताना सांगितले कि,युवकांमध्ये सुप्त गुण दडलेले आहेत ते सुप्त गुण प्रदर्शित करण्यासाठी असे क्रिडा सम्मेलन घेणे गरजेचे आहे,मात्र या साठी शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही पण युवकांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघाकडून प्रत्येक गांवात पुरस्कार देत असतो,खेळ खेळत असताना हार-जीत होत असते मात्र आपण हरलो म्हणून खचून जाऊ नये विजय एक दिवस आपली पण होऊ शकतो तसेच पुढे बोलताना म्हणाले ग्रामीण असो किंवा शहरी असो प्रत्येक ठिकाणी व्हॉलिबाल स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहेत प्रत्येक ठिकाणी आदिवासी विद्यार्थी संघाकडून पारितोषिक देत असताना आम्हचा एकच उद्देश्य आहे.युवकांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले पाहिजे व एक चांगल खेळाडू तयार झाले पाहिजे तेव्हाच तर आपल्या गावाच्या व तालुक्याच्या नावलौकीक होत असतो.हे होत असताना गावातीला सामाजिक,शैक्षणिक,व विकासाबाबतीत चर्चा घडून येत असते व समस्याच्या निराकरण होत असते असे मत व्यक्त केले.अहेरी तालुक्यातील कोत्तागुडम येते जय सेवा क्रीडा मंडळ कोत्तागुडम (वट्रा) च्या वतीने भव्य ग्रामीण ग्रामीण व्हॉलीबाल स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला बोलत होते..!!

यावेळी मंचावर अहेरी मा.गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा ग्रा.प.सदस्य इंदाराम,महेश लेकूर सदस्य देवलमारी,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,चिरंजीव उपसरपंच आवलमारी,प्रवीण आत्राम,रमेश सडमेक,तुरुपती मडावी,दिलीप आत्राम,सुरज सिडाम,रामदास आत्राम,विनोद येणका,राकेश सडमेक उपस्थित होते..!!

सामान्यांच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष:-रवी आत्राम,उपाध्यक्ष:-महेश येन्नम,सचिव:-धर्मेंद्र सिडाम,कोशाध्यक्ष:-साईनाथ सिडाम व मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य गण गावकरी महिला वर्ग उपस्थित होते..!!

About The Author

error: Content is protected !!