December 23, 2024

नवरगाव, अरत्तोंडी सती नदी पात्रातून रेती उत्खनन आता २४ तास सुरू; जेसीबी, पोकलेंडच्या सहायाने थेट नदी पत्रातून उपसा

1 min read

रात्रौ होणाऱ्या अवैध उपश्यामुळे भरधाव ट्रॅक्टर या भागात धावत असल्या मुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांचे जीव धोक्यात आले आहे.

अवैध रेती उपशयाला कुणाचा आशीर्वाद; तक्रारीवर प्रभावी कार्यवाही न झाल्याने उत्खनन करणारी टोळी पूर्ण प्रशासनच खिश्यात असल्याची डींगा मारत आहेत.

कुरखेडा,
नवरगाव लागत सती नदी पात्रातून अवैध रेती उपसा सुरू असल्याची तक्रार येथील शेतकरी संजय कवाडकर यांनी केली होती.
तक्रारी नंतर प्रशासनिक स्तरावरून या अवैध उपश्याला निर्बंध घालून कार्यवाही होईल ही अपेक्षा लोकांना होती. मात्र या बाबत कुठलीच कार्यवाही अद्याप झाली नसल्याने अवैध उपसा करणारी टोळीची हिमत वाढली असून 24 तास सती नदी पात्रातून यंत्रांच्या साहाय्याने अवैध उपसा सुरू आहे.
या परिसरात रात्रीची वीज पुरवठा असल्याने शेतकरी शेतातील धान पिकाला पाणी पुरवठा करण्याकरिता शेतावर जात असल्याने रत्रोभर भर वेगाने सती नदी पात्रातून रेती उपसा केली जात असल्याने या भरधाव ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांचे जीव धोक्यात आलेले आहे.
याच परिसरात अवैध रेती उपसा करणाऱ्या टोळीने अरत्तोंडी येथील भिवेश कुमरे नामक व्यक्तीचा जीव घेतला असल्याची परिसरात चर्चा होती. मात्र व्यवस्थित तपासा अभावी त्याचे मारेकरी अजून मोकाटच आहेत.
अश्यातच आता या टोळीने आता आपली अवैध उपश्याची काम वैद्य ठरविणे करिता अरत्तोंडी येथील एका शेतकऱ्याच्या नावे शेती मधील रेती उपसा करण्याचा देखावा करून प्रत्यक्षात सती नदी पात्रातून उत्खनन करत आहेत.
दिवसा लोकांच्या नजरेत पडत असलेले सदर अवैध उत्खनन प्रशासनाला मात्र का दिसत नसेल असा प्रश्न आता सामान्य माणूस विचारू लागला आहे.
यातच घर कामासाठी एक बंडी मधून होणाऱ्या वाहतुकीचा पत्ता ज्या महसूल प्रशासनास लागतो त्या विभागातील या परिसरात कर्तव्यावर असलेल्यांना अधिकारी, कर्मचारी यांना मात्र येवढे मोठे उत्खनन बाबत माहिती होत नसेल या बाबत शंकाच आहे.

About The Author

error: Content is protected !!