December 23, 2024

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावे उभारण्यात येणाऱ्या कुरखेडा येथील अर्धवट बांधकाम झालेल्या सभागृहाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना मदत करेल का?

1 min read

कुरखेडा नगरपंचायत परिसरात अर्धवट बांधकाम झालेले सभागृह.

कुरखेडा,(नसीर हाशमी); ९ फेब्रुवारी;
नगरपंचायत कुरखेडा येथे निधी संपला म्हणून अर्धवट स्थितीत असलेल्या सभागृह बांधकाम बाबत आश्चर्यकारक माहिती समोर आलेली आहे.
गडचिरोली न्यूज नेटवर्क सोबत विविध वृत्त पत्रातून कुरखेडा नगरपंचायत येथील प्रशासनिक अव्यवस्थेला आरसा दाखविल्यानंतर आता या अर्धवट असलेल्या बांधकामाबद्दल धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे. ज्या बांधकामाला पूर्ण करण्यासाठी निधी मागणी केली असल्याचा येथील कार्यरत अभियंता आरिफ शेख यांनी एका वृत्त पात्राच्या प्रतिनिधीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. परंतु प्रत्यक्षात नगरपंचायत कुरखेडा यांनी मागील एक वर्षापासून या बांधकामाला पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पुढाकार करून ठराव किंवा पत्रव्यवहार प्रशासनाकडे केला नसल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे.
निधी मागणी करिता कुठलाही ठराव व पत्राव्यवहार न करता फक्त वृत्तवाहिन्यांमध्ये आपली बाजू मांडण्यासाठी खोटी बाजू ठेवणाऱ्या अभियंत्यावर आता येथील प्रशासन व पदाधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वैशिष्ट्येपूर्ण विकास निधीतून उभारण्यात येणाऱ्या सदर अर्धवट बांधकामाबद्दल कुठल्या उपयोजनेतून मागणी करण्यात आली आहे व किती पैशाची मागणी केली आहे याबद्दल कुठलेही समाधानकारक उत्तर नगरपंचायत प्रशासनाकडून मिळालेले नाहीये. उलट या बांधकामाकरिता कसलाही ठराव किंवा चर्चा नगरपंचायत च्या कुठल्याही एकाही सभेमध्ये झालेली नसल्याची खात्रीलायक माहिती आहे.
कुरखेडा नगरपंचायत चे पहिले नगराध्यक्ष महेंद्र मोहबंसी हे सदर सभागृह बांधकाम करून घेण्याकरता आग्रही असल्याचे येथील काही पदाधिकाऱ्यांनी चर्चेदरम्यान बोलून दाखवले. सदर सभागृहाला हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची ही चर्चा केली असल्याचे म्हटले जात आहे. परंतु स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात सत्तेसाठी दोन गटात विभागलेली आहे. एक सत्ता भोगत आहे तर दुसरी सत्तेच्या बाहेर आहे. आता बाळासाहेबांच्या नावे उभारण्यात येणाऱ्या व निधी अभावी अर्धवट बांधकाम झालेल्या या सभागृहाला बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना मदत करेल का? असे प्रश्न विचारू लागले आहेत. निधी उपलब्ध होवून सदर सभागृहाचे बांधकाम कधी पूर्ण होते याकडे कुरखेडा नगरवसियांचे लक्ष लागले आहे.

About The Author

error: Content is protected !!