मुलचेरा येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर उद्घाटन सोहळा संपन्न
1 min readजीवनात यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम- सौ. करिश्मा चौधरी, तहसीलदार
राष्ट्रसेवा हीच ईश्वर सेवा- डॉ. रंजित मंडल
मुलचेरा: – स्थानिक मूलचेरा नगरपंचायत नगरीतील मुलचेरा टोला येथे स्थानिक नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ” आरोग्य जनजागृती व ग्रामविकासाकरिता युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित विशेष शिबिराचा उद्घाटन सोहळा दिनांक 8 फेब्रुवारी 2023 स्तळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलचेरा टोला येथे संपन्न झाला.
राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना विशेष शिबीर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जीवनात यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम करणे आवश्यक आहे, त्यासाठी आपले ध्येय निश्चित करून यश संपादन करावे असे प्रतिपादन सौ. करिष्मा चौधरी तहसीलदार मुलचेरा यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात व्यक्त केले.
देशाच्या उन्नत प्रगती करिता राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आपल्या विविधांगी उपक्रमाने, समाजसेवेची कर्तव्य मनात जोपासून समाजसेवा करीत असतात, त्यातच त्यांची राष्ट्रसेवा या रासेयो विशेष शिबिराप्रसंगी दिसून येते. असे प्रतिपादन रासेयो विशेष शिबिर उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर रणजीत मंडळ यांनी व्यक्त केले.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रणजीत मंडळ उपस्थित होते. तसेच उद्घाटक म्हणून सौ करिष्मा चौधरी तहसीलदार या उपस्थित होत्या. तर मुख्य अतिथी म्हणून एडवोकेट चौधरी, सौ. सुवर्णाताई येमुलवार माझी सभापती पंचायत समिती मुलचेरा, श्री. विकासजी नैताम नगराध्यक्ष नगरपंचायत मुलचेरा, ज्येष्ठ नागरिक गणपतजी मडावी उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सौ. उषाताई पेंदाम पोलीस पाटील मुलचेरा, सौ सुनीताताई कोकीळवार व सौ. मनीषाताई गेडाम नगरसेविका नगरपंचायत मुलचेरा उपस्थित होत्या.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवारांनाच्या हस्ते रासेयो ध्वजाचे याप्रसंगी ध्वजरोहन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी स्वागत गीताने व आदिवासी रेला लोकनृत्य सादर करून मंचावर उपस्थित मान्यवरांचे याप्रसंगी हार्दिक स्वागत करण्यात आले.
सतत सात दिवस चालणाऱ्या शिबिरातील नियमित कार्यक्रम प्रार्थना, योगा, स्वच्छता, श्रमदान, साक्षरता, सर्वेक्षण, चर्चासत्र / व्याख्यान, प्रबोधनात्मकव सांस्कृतिक कार्यक्रम, सिकलसेल शिबिर, मतदान नोंदणी अभियान, आरोग्य तपासणी शिबिर, याबद्दल विस्तृत अशी माहिती राष्ट्रीय सह-समन्वय कार्यक्रम अधिकारी डॉ. ललितकुमार शनवारे सर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणेतून विशद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गौतम वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सचिन शेंडे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील डॉ. हरी शिवप्रसाद, डॉ. बाचेर, डॉ. अशोक शेंडे, डॉ. रॉय सर, डॉ. प्रियंका पाटील मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.