April 25, 2025

अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक भागात बससेवा सुरू करण्यात यावी..!

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी आगार प्रमुख यांच्याशी चर्चा केली.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली, मुलचेरा भामरागड, सिरोंचा, अहेरी,या तालुक्यातील काही ग्रामीणभागात अद्याप बस सेवा सुरु नसून येणाऱ्या जाणाऱ्या जनतेला त्रास सहन करावे लागत आहे.अहेरी विधानसभा क्षेत्रातील काही ग्रामीण भागात बस सेवा सुरु नसून ग्रामीण भागतील शालेय विध्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.व कोणत्याही कामांनिमित्त कुठेही बाहेर गावी जाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकाना पायी चालत किंवा खाजगी ट्रॅक्सी ने जावे लागत आहे.हिबाब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या लक्षात येताच राज्य परिवहन महामंडळ अहेरीचे आगार प्रमुख श्री.राठोड साहेब यांच्याशी अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावा गावात बस सेवा सुरळीत करण्यात यावी या करिता चर्चा करण्यात आले..!!यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांतभाऊ गोडसेलवार, नरेश गर्गम, विनोद रामटेके, राकेश सडमेकसह आदिउपस्थित होते..!!

About The Author

You may have missed

error: Content is protected !!