April 25, 2025

जय सेवा बाॅय – बाॅय क्लब नैनगुडा यांच्या वतीने भव्य ग्रामीण कब्बड्डी व व्हॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन

*माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन..!!*

एटापल्ली तालुक्यातील नैनगुडा येथे जय सेवा बाॅय – बाॅय क्लब यांच्या वतीने भव्य ग्रामीण कब्बड्डी व व्हॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

सदर क्रीडा स्पर्धेसाठी पहिला दुसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या स्पर्धेच्या विजेता संघाला देण्यात येत आहे.आज सदर स्पर्धेचे लोकप्रिय माजी जिल्हा अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते उदघाटन करण्यात आले.जि.प.अध्यक्ष यांना आदिवासीचे विविध नूत्या करून व ढोल ताशाने जंगी स्वागत केले.या कर्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोटामी ग्रामपंचायतचे सरपंच सिंधूताई मुहुंदा होते..!!

यावेळी उपस्थित सुधाकर गोटा,वेलासर इलका गोटुल प्रमुख,प्रज्वालभाऊ नागुलवार,कमलताई हेडो.सरपंच कसनसुर,विलास कोटामी,सरपंच,अनीलभाऊ करमरकर,महादेव पदा.उप सरपंच ग्रा.प.कोटमी,बंडू कोल्हा.पोलीस पाटील,सनाकू कोल्हा.गाव भुमिया,हरेकृष्णा सरकार,सादू मट्टामी,खेळकर सर,च्यायाताई कोवासे,नरेश गावडे, राजुभाऊ गोमाडी,शेख सर,कोटमी,नारायण पेंदोर.सरपंच,अर्चनाताई मडावी अंगणवाडी सेविकांसह नैनगुडा परिसरातील आविसंचे शेकडो कार्यकर्ते व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते..!!

About The Author

You may have missed

error: Content is protected !!