*कोत्तागुडम (वट्रा) येथील व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते बक्षीस वितरण*
1 min read*जयसेवा क्रीडा मंडळाकडून व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन*
अहेरी तालुक्यातील कोत्तागुडम (वट्रा) येथे जयसेवा क्रीडा मंडळाकडून आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे बक्षीस वितरण भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागिय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी व्हॉलीबॉल या खेळाविषयी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आल्लापल्ली ग्राम पंचयातचे माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,विनोद कावेरी,तिरुपती मडावी,रवी आत्राम,महेंद्र येणका, राकेश सडमेक,प्रवीण आत्राम,साईनाथ सिडाम,मल्लेश येणका,बक्कय्या सिडाम,शंकर सिडाम,बुच्चीराम आत्राम,वसंत मडावी,गंगाराम मडावी,रामसाई सिडाम आदी मान्यवर उपस्थित होते. या बक्षीस वितरण सोहळ्याला येथील गावकरी व खेळाळू मोठ्यासंख्येने उपस्थित होते.