April 25, 2025

गडचिरोली येथील गोंडवन विद्यापीठात येणा-या बजेट मध्ये “आदिवासी अध्यासन” मंजूर करून आर्थिक तरतूद करा – प्रभू राजगडकर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, विधी मंडळातील आदिवासी सदस्यांना निवेदनातून व जाहिर पत्र प्रसिद्ध करून मागणी

गडचिरोली; (नसीर हाशमी); दि. ९ फेब्रुवारी.
येत्या ९ मार्चला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर होत आहे. या अधिवेशनात गडचिरोली येथील गोंडवन विद्यापीठ करिता बजेट मध्ये “आदिवासी अध्यासन” मंजूर करून आर्थिक तरतूद करून निधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ,विधी मंडळातील आदिवासी सदस्य यांना निवेदन पाठवून ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रभू राजगडकर यांनी केली आहे.

या पूर्वी ही श्री. राजगडकर यांनी ८ मार्च २०१८ ला वर्तमान उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री यांना सविस्तर पत्र पाठवून गडचिरोली येथील गोंडवन (गोंडवाना नव्हे)विद्यापीठात “आदिवासी अध्यासन “स्थापन करण्याविषयी कळविले होते. मात्र मुख्यमंत्री यांचे कडून काहीही उत्तर आले नाही. मात्र महामहिम राज्यपाल यांचे कडून पत्राचे उत्तर आले होते. गेल्या २०१८ पासून या “आदिवासी अध्यासन” करिता पाठपुरावा प्रभू राजगडकर करीत आहेत.
माहिती प्रमाणे या विषयीचा प्रस्ताव शासनाकडे गेल्याचे कळले .सादर प्रस्ताव परत आला व पुनश्च तो सादर केला असल्याचे खुद्द मा. कुलगुरू, गोंडवन विद्यापीठ यांनी दि ४ जानेवारीला इंडियन सायंस काॅन्ग्रेस मध्ये भेट झाली असता सांगितले असल्याचे रजगडकरांचे म्हणणे आहे.
राजगडकर यांनी विधिमंडळातील सर्व आदिवासी आमदारांना आवाहन व विनंती केली आहे की, त्यांनी ही गोंडवन विद्यापीठात “आदिवासी अध्यासन “स्थापन करण्याविषयीयासाठी आग्रह धरावा.

महामहिम राज्यपाल यांनी कुलपती म्हणून यामध्ये आवर्जून लक्ष घालून मान्यता मिळणे व निधी उपलब्ध होईल असे पाहावे असेही प्रभू राजगडकर यांनी लेखी पत्राद्वारे मागणी केलेली आहे.

प्रभू राजगडकर यांनी मागणी केलेले पत्र प्रशासन स्तरावर तातडीने पोहचले तरी संबंधितांपर्यंत जाईलच किंवा जावू देतील याची खात्री नसल्याचे नमूद करत ते पात्र त्यांनी सोशल मीडिया द्वारे जाहीर प्रसिद्ध केले आहे.

त्यांच्या या मागणीला राज्यसरकार कसे प्रतिसाद देते याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!