रक्तदात्यांनी स्वयं स्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली
1 min read*स्वयं रक्तदाता जिल्हा समिती गडचिरोली तथा मराठी विज्ञान परिषद आरमोरी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
आरमोरी; ०९ फेब्रुवारी;
उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे स्वयं रक्तदाता जिल्हा समिती गडचिरोली व मराठी विज्ञान परिषद आरमोरी यांचा संयुक्त विद्यमानेआयोजित रक्तदान शिबिरात आरमोरी येथील दहा रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली .
यावेळी स्वयं रक्तदाता जिल्हा समिती गडचिरोलीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत व मराठी विज्ञान परिषद आरमोरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. के.टी .किरणापुरे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रोहित कोल्हे, कृणाल नवघरे, अमित राघोर्त, चंद्रशेखर मेश्राम, ज्ञानेश्वर बेहेरे, अरविंद डूमरे, त्रिदेव जांभुळे, सौरभ माकडे, निखिल नैताम, प्रविण काळबांधे यांनी रक्तदान केले. यावेळी रक्त संक्रमण करणारी टीम गडचिरोली येथील पी. आर, ओ. सतीश तडकलावार, बंडू कुंभारे, आशिष वासनिक, तंत्रज्ञ योगिता काटंगे, यांनी सहकार्य केले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. छाया उईके, कु. डॉ. नैताम, पारधी सिस्टर व कर्मचारी बांधव उपस्थित होते.