December 23, 2024

कुरखेडा येथे तीन दिवसीय शिवजन्मोत्सवाचे आयोजन

1 min read

१७,१८,१९ फेब्रुवारी २०२३ या ३ दिवस विविध स्पर्धा , कार्यक्रमाच्या आयोजनाने या वर्षी साजरी होणार शिवजयंती.

कुरखेडा, ९ फेब्रुवारी: (नसीर हाशमी)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त कुरखेडा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ व समस्त शिवभक्त परिवार यांच्या वतीने या वर्षी तीन दिवसीय शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांनी यावर्षी जयंती साजरी केली जाणार आहे.

शिवजन्मोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारी रोज शुक्रवारला या तारखेला सकाळी १० ते १ वाजेपर्यंत कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात “रक्तदान शिबिर” आयोजित केलेले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याची आव्हान मंडळांनी केलेले आहे. स्वच्छते रक्तदान करू इच्छिणाऱ्या रक्तदात्यांनी नाव नोंदणी करिता सागरभाऊ निरंकारी 9405940501, प्रशांत हटवार 8412907093 यांचेशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी असे आवाहन केलेले आहे.

दुसऱ्या दिवशी 18 फेब्रुवारी शनिवारला सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत गांधी चौक येथे “डान्स स्पर्धा” आयोजित केली असून या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील महिला व पुरुष सहभागी होऊ शकतात. डान्स स्पर्धा ही फक्त ऐतिहासिक गोष्टीवर अवलंबून असलेल्या नृत्याला धरून असावी. डान्स स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शोएब पठाण 706637798 व गणेश चौधरी 7620759311 यांच्याशी संपर्क करून नोंदणी करण्या चे आव्हान केलेले आहे. डान्स स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांकरिता करिता प्रथम पारितोषिक 3001 रुपये द्वितीय पारितोषिक 2001 रुपये व तृतीय पारितोषिक 1001 रुपये ठेवण्यात आलेला आहे.

सायंकाळी 4 ते 5.30 वाजता पर्यंत गांधी चौक कुरखेडा येथे “वेशभूषा स्पर्धा” आयोजित केली असून ऐतिहासिक वेशभूषेला अनुसरूनच पोशाख परिधान करून या स्पर्धेत सहभाग घेता येईल. सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता दीपक धारगाय 8208710001व राहुल दांडेकर 7030581169 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केलेले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांकरिता करिता प्रथम पारितोषिक 3001 रुपये द्वितीय पारितोषिक 2001 रुपये व तृतीय पारितोषिक 1001 रुपये ठेवण्यात आलेला आहे.

सायंकाळी ७ वाजता गांधी चौक येथे शिवभक्त शुभम प्रजापति यांचे प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केलेले आहे. शिवरायांच्या ऐतिहासिक घडामोडींची माहिती व त्यांचे हिंदवी स्वराज्य याबाबत तपशीलवार प्रबोधन यावेळी केले जाणार असून कुरखेडा परिसरातील समस्त नागरिकांनी या क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आयोजक मंडळांनी केलेले आहे.

तिसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता फवारा चौक येथे ध्वजवंदन होईल. ध्वजवंदनानंतर ९ वाजता फवारा चौक इथूनच बाईक रॅलीचे आयोजन केले असून शिवरायांचे जय घोष करत संपूर्ण कुरखेडा नगरीची फेरी केली जाईल. दुपारी २ वाजता फवारा चौक येथे राज्याभिषेक आरती व पाळणा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

दुपारी तीन वाजता फवारा चौक येथे बक्षीस वितरण कार्यक्रम होईल यामध्ये सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्रावीण्य मिळवलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व रोख रक्कम अदा केली जाईल. सायंकाळी ४ वाजता महाप्रसाद वितरित केला जाईल यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केलेले आहे.

सायंकाळी सहा वाजता गांधी चौक येथून भव्य झाकी व रॅलीचे आयोजन केले आहे.

“ऑनलाइन रंगोली स्पर्धेचे आयोजन”

शिवजन्मोत्सवानिमित्त ऑनलाइन रंगोली स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित रांगोळी काढून व्हाट्सअप नंबर वर फोटो पाठविण्याचे आवाहन केलेले आहे. रांगोळीचे दोन्ही बाजूचे फोटो व रांगोळी सोबत सेल्फी पूर्ण नाव पत्ता पाठवणे गरजेचे आहे. सदर स्पर्धेमध्ये कुठल्याही वयोगटातील महिला व पुरुष सहभागी होऊ शकतात यासाठी कुठल्याही वयाची अट ठेवण्यात आलेली नाही. सदर रांगोळीचे फोटोज 19 फेब्रुवारीला सकाळी दहा वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत 8275290935 या व्हाट्सअप नंबर वर पाठवायचे आहेत. स्पर्धे मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांकरिता करिता प्रथम पारितोषिक 3001 रुपये द्वितीय पारितोषिक 2001 रुपये व तृतीय पारितोषिक 1001 रुपये ठेवण्यात आलेला आहे.

ऑनलाईन रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मुकेश माकडे 8275290935 व गोपाल वैरागडे 7066302369 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केलेले आहे.

कुरखेडा येथे आयोजित होणाऱ्या तीन दिवसीय शिवजन्मोत्सवामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवून आयोजनामध्ये सहकार्य करावे असे आवाहन आयोजन मंडळाकडून करण्यात आलेले आहे.

About The Author

error: Content is protected !!