रेती तस्करी करणाऱ्या ट्टिपरने वकीलास उडवीले
1 min readगडचिरोली : ९ फेब्रुवारी;
रेतीची अवैध तस्करी मध्ये लीप्त असलेल्या एका हायवा ट्टिपरने गडचिरोलीच्या गांधी चौकात धडक देऊन दहा मिटर पर्यंत चिरडत नेले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एम.एच.३३ टी. ३०५३ या क्रमांकाचे हायवा ट्टिपर चंद्रपूर रोडवरुन आरमोरी रोडकडे वळतांना दुचाकी चालक ॲड.प्रमोद धाईत यांना धडक देत १० मिटर चिरडत नेले. सुदैवाने ॲड.प्रमोद धाईत बचावले असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
गांधी चौकात अपघात घडला त्यावेळी वाहतूक पोलीस इतर गाड्या चालान करण्यात गुंग होते. त्यामुळे त्यांचे वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याने ट्रक ड्रायव्हरने बेदरकारपणे वाहन चालवल्याने हा अपघात झाला असल्याबाबत उपस्थित नागरिकांनी वाहतूक पोलिसां विरोधात रोष व्यक्त केला आहे.