अरत्तोंडी – नवरगाव सती नदी पात्रातून अवैध रेती उपश्याची जिल्हाखानिजकर्म अधिकाऱ्यांनी घेतली दखल
1 min readकुरखेडा येथील तहसीलदारांना पत्र पाठवून चौकशी अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश.
कुरखेडा; ९ फेब्रुवारी:
अरत्तोंडी येथील शेतकऱ्यांच्या नावावर शेतातील रेती काढण्यासाठी मिळवलेल्या परवानाचा आधार घेऊन थेट नदीपात्रातून प्रमाणापेक्षा अधिक उपसा करत असल्याची तक्रार येथील शेतकरी संजय कावळकर यांनी मुख्यमंत्री सचिव कक्ष येथे केली होती.
तक्रार दाखल केल्या नंतर जिल्हाखनिजकर्म अधिकाऱ्यांना ही या तक्रारीबाबत प्रतिलिपी सादर केले होते. सदर तक्रारीची दखल घेत, जिल्हा खनिज कर्म अधिकारी यांनी कुरखेडा तहसीलदार यांना 31 जानेवारीला अवैध रेती उपश्य प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
तहसीलदार कुरखेडा यांना दिलेल्या पत्राची प्रतिलिपी येथील शेतकरी संजय कवडकर यांना प्राप्त झाली असून त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर नदीपात्रातील उपसा झालेल्या रेतीचा योग्य चौकशी अहवाल खनिज कर्म अधिकारी यांना प्राप्त झाला तरच या रेती उपसा टोळीच्या मुसक्या आवळण्यात प्रशासन सफल होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
झालेल्या गैरप्रकार बाबत काय अहवाल तयार होईल व महसूल प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.