September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

हंगामी कर्मचाऱ्यांचा एल्गार: गडचिरोलीत 22 जुलैपासून आरोग्य सेवेवर परिणाम”

“गडचिरोली हिवताप नियंत्रणासाठी हंगामी कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन, 22 जुलैपासून आंदोलनाची घोषणा”

गडचिरोली, 14 जुलै :  गडचिरोली जिल्ह्यातील हंगामी क्षेत्र कर्मचारी, जे हिवताप नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, त्यांनी आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणास्तव दिनांक 22 जुलै 2025 पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा गडचिरोली यांनी याबाबत मा. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांना निवेदन सादर केले आहे.

जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, धानोरा, अहेरी, कोरची, सिरोंचा, मुलचेरा, कुरखेडा आणि चामोर्शी या तालुक्यांमध्ये दरवर्षी हिवतापाचे हजारो रुग्ण आढळतात. यंदा 2025 मध्ये मलेरियामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. हंगामी क्षेत्र कर्मचारी दरवर्षी जानेवारी आणि मे/जून महिन्यात सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्यरत असतात. मात्र, त्यांना वर्षातून केवळ 179 दिवसांचे काम मिळते, आणि जुन्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिल्याने 2016 पासून नियुक्त कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
1. हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचे एकवेळ समावेशन करावे.
2. बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) पदासाठी 50% आरक्षण पुर्ववत करावे.
3. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या धर्तीवर 11 महिन्यांचे कामाचे आदेश द्यावेत.
4. अतिदुर्गम भागात मुख्यालयी राहण्यासाठी घरभाडे आणि प्रवास भत्ता द्यावा.
5. नियमित कर्मचारी निवडीसाठी कमी काठिण्याचा स्वतंत्र पेपर आणि 45% गुणांची अट शिथिल करावी.
6. मानधनात वाढ करून दरमहा मानधन द्यावे.
7. आरोग्य आणि अपघात विमा लागू करावा.

आंदोलनाचा परिणाम:  कर्मचाऱ्यांनी सांगितले की, अतिदुर्गम भागातील बिकट भौगोलिक परिस्थिती, रस्त्यांचा अभाव आणि दर चार महिन्यांनी बदलणारी उपकेंद्रे यामुळे कामात अडचणी येतात. यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिकता ढासळते आणि काही ठिकाणी आरोग्य सेवा पोहोचत नाही. आंदोलनामुळे हिवताप नियंत्रणाच्या कामावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

संघटनेचे आवाहन: महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा गडचिरोलीचे अध्यक्ष बस्सायादे यांनी प्रशासनाला मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा, 22 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!